दुःखाची झालर मिरवत,
सदोदित जो हसतो ,
तो बाप असतो.
मुलाच्या स्वप्नांसाठी,
मुलीच्या भवितव्यासाठी,
साऱ्या कुटुंबाच्या सुखासाठी,
जो आहोरात्र कसतो,
तो बाप असतो.
मेहनितीच्या पडद्याआड बाप सर्व काही विसरून जातो,
लपवून दुःख मनातले तो सदाबहार गाणी गातो,
नेहमी सर्वांना खुश ठेवण्यासाठी
तो स्वत:च्या अपेक्षांचा पडदा झाकतो,
दुःखाची झालर मिरवत,
सदोदित जो हसतो ,
तो बाप असतो.
कधी कठोर तर कधी प्रेमळ बाप
तो देखील रडतो,
काठोकाठ भरलेलं डोळ्यातील पाणी
आपल्या नकळत झाकून ठेवतो,
तो बाप असतो.
परिस्थितीचे चटके सहन करतो तो,
प्रत्येक संकटाला खंबीरपणे भिडतो तो,
आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो
स्वतःचे कष्ट पणाला लावतो,
दुःखाची झालर मिरवत,
सदोदित जो हसतो ,
तो बाप असतो,
तो बाप असतो.
- सुमित वाघमारे
3 Comments
Nice Poem Bro
ReplyDeleteBhau Tuza Number de ki...
ReplyDeleteKharch ahe 💯
ReplyDelete