दिसेना मला माझे कोणी,
काळोखात बुडालो मी.
मनातील भाव समजेनासे झाले,
हृदयातील सारे ओठांवर आले,
अश्रूंच्या धारेत मनभाव ते सारे भिजुनी गेले,
हरवला तो समजूतदारपणा,
विखुरली ती नाती,
दुरावला तो माणूस,
आणि संपली ती वाणी,
दिसेना मला माझे कोणी,
काळोखात बुडालो मी.
स्वत:च्या दुःखात सामील होऊन मी हतबल झालो,
एकटेपणाच्या संकटात मी अर्धपुरता मेलो,
मला जगायचय म्हणताना मी जगायचे विसरून गेलो,
सोडून गेली मला ती माणसं जी गरजेपुरती जवळ आली,
त्यांच्याकडून अपेक्षा ठेवता ठेवता दुःखाच्या
दरीत ढकलून गेली,
दिसेना मला माझे कोणी,
काळोखात बुडालो मी
काळोखात बुडालो मी.
- सुमित वाघमारे
0 Comments