श्रीमंतीचा माज असणाऱ्या लोकांना त्यांच्यापेक्षा गरीब लोकांना गरीब म्हणण्यापेक्षा पूर पर्सन्स आहेत सोडून दे असं म्हणण्यात जास्त अभिमान वाटतो.... पण त्याच गरिबाला भावना असतात... मन असतं... विचार असतात... समस्या असतात... याचा कधी विचार आजपर्यंत कोणत्या श्रीमंताने केला नाही आणि कोणत्या राज्यकर्त्यांनी केला नाही हीच एक खंत आहे. हे एक पुस्तक म्हणजे या सर्वांचा एक भाग आहे.
या पुस्तकात थोडक्यात.....
ही कथा आहे भूक, गरीबी आणि दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या प्रत्येकाची. जीवनात सर्व धडपड ज्या गोष्टीसाठी चालली आहे ती केवळ उद्याचा दिवस पाहण्यासाठी आणि भाकर तुकडा खाण्यासाठी. भाकर जे पुस्तक बाबाराव माडवी या लेखकाने लिहिले आहे त्यांनी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, "हालअपेष्टा सहन करून जगण्याच्या वाटा स्वतःहून निर्माण करून केवळ भाकरीसाठीच प्रामाणिक कष्टाचं जीणं असावं."
आयुष्यात कुठून कुठे जीवनाच्या ठिणग्या पडतील हे काही सांगता येत नाही. सदू आणि पारबतीचं पोर जागो ज्याला कामाला लावण्यासाठी पैशाची मागणी केली तेच पोर समाजाचे नेतृत्व करून आंदोलनात बापाच्या डोळ्यात देखत छाताडावर गोळी झेलून वीरमरण पत्करतो. तर एकीकडे भाकरीसाठी झुंजणाऱ्या माणसांची संख्या मुंग्यांसारखी आहे. म्हणूनच या पुस्तकातील बाजा आणि बायजाच्या कथेचा उल्लेख करावासा वाटतो..... बाजान कोणाची लाचारी केली नाही ना कधी लबाडी केली तो नेहमीच प्रामाणिकपणाचे जीवन जगत आला होता.... पण काळाने घात केला आणि बाजा एका केस मध्ये जेलात गेला. इकडे बाजा जेलात गेला आणि बाजाची बायको बायजा आणि त्यांची मुलगी उघड्यावर पडल्या... घरातल्या कर्त्या पुरुषाच्या जेलात जाण्याने बायजावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी येऊन ठेपली होती. पण बायजाने दाखवून दिले की एका बाईने ठरवले तर काहीही होऊ शकते... एका बाईच्या हातात तिच्या कुटुंबाची व संसाराची चावीच असते.... आणि हेच बायजाणे तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवले होते. बायजाने पुढे संसाराचा गाडा हाकला आणि ती सुद्धा बाजा सारखं प्रामाणिकपणाच जीवन जगू लागली.... व तिच्या संसाराशी एकनिष्ठ राहिली. बाजा - बायजाची पोर मोठी होत होती, अशातच बायजाचं काम बंद झाले आणि घरात येणारी भाकर बंद झाली... दुष्काळात तेरावा महिना म्हणत्यात तसेच काही झाले आणि बायजा प्रचंड आजारी पडली... घरात अन्नाचा कण नाही आणि बायजा आजारी..! तेव्हा पोरीने भीक मागून भाकर आणली पण बायजान ती खाल्ली सुद्धा नाही. तिने पोरीच्या मुस्काडात ठेवून सांगितले, "कारटे बापाची इज्जत ठेव... भीक मागंशील तर लोक थुकतीन म्हया जिंदगीवर." बायजा उपाशी राहिली आणि अशातच तिने एका भाकरीच्या तुकड्या वाचून जीव गमावला.
अपंग प्रेमाच्या किंकाळ्या या कथेतून असे जाणवले की... अपंग माणूस जरी असला तरी तो प्रेमावाचून अपंग झाला तर तो कधीच उभारी येऊ शकत नाही हेच सुरेश - शांतीच्या प्रेमविरहातून जाणवते. इकडे शांतीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न झाले आणि तिकडे निशा गावोगावी जाऊन नाच करायची... ती सुद्धा म्हणाली, "पापी पेट के लिए नाचती हूं... संसार के सभी हमारे गांव है... जहां रोटी है वही हमारा गांव है। निशाचे घुंगरू तुटले असतील पण निशा जीवन जगत असताना कधीही तुटली नाही.
अशा अनेक कथा आहेत ज्यामध्ये प्रेम, विरह, शेती, देशभक्ती... यातून सर्वात शेवट येतो तो पोटापाण्याचा... आणि भाकरीचा. प्रत्येक कथेचा शेवट हा भाकरी वरती येऊन थांबतो. कोणी शेतात काही पिकलं नाही म्हणून गळफास लावून घेतो तर सर्जा देशासाठी प्राणाची आहुती देतो.
आणि शेवट येतो तो कुठेही वस्तीतले स्वातंत्र्य ? मला वाटतं हे वस्तीतलं स्वातंत्र्य नक्कीच राज्यकर्त्यांच्या बुडाखाली दबलेले आहे. त्याचे वर्चस्व हेच वस्तीतल्या स्वातंत्र्याची समस्या बनली आहे... मी तर म्हणतो या राज्यकर्त्यांना ही समानता येऊच द्यायची नाही... वस्तीतला शहरात यावा त्याने शिकावं आणि त्यानं समाजाचा उद्धार करावा.... तर मग आश्वासनावर जगणारी राजकीय पिल्ले यांचे राजकारण कसे चालेल.... इथेच तर विचार केला पाहिजे... नक्की पाणी कुठे मुरत आहे.
लेख संपला... पण भाकरीच्या, सर्वसामान्यांच्या जगण्याच्या, नोकरीचा, उज्वल भविष्याचा, तरुणांचा, महागाईचा, बेरोजगारी सारख्या अनेक प्रश्नांचे काय...?
एकदा पुस्तक नक्की वाचा.... यातून तुमचा भाकरीचा प्रश्न तर नाही सुटणार पण सामाजिक समानतेचा समतोल राखण्याचे भान राहील....
धन्यवाद....!!
लेखक : सुमित योजना अशोक वाघमारे
(सदरचे पुस्तक ऑनलाईन स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे.)
0 Comments