ticker

6/recent/ticker-posts

ती फक्त आणि फक्त आई असते..



प्रत्येक वेळी तिच्या आशीर्वादाचा हात आपल्या मस्तकावर असतो,
तेव्हाच तर सर्व आव्हाने झेलीत आकाशाला पिंजून घेता येत असतं..
म्हणूनच तर ती फक्त आणि फक्त आई असते.

प्रत्येक सुख हे ती आपल्याला वाटत असते,
आपल्या वाट्याचे दुख ती स्वताच्या पदरात घेत असते..
म्हणूनच तर ती फक्त आणि फक्त आई असते.

आपले कौतुक करणारे खूप असतात,
पण ते कौतुक ती आनंद अश्रूतून दाखवत असते..
म्हणूनच तर ती फक्त आणि फक्त आई असते.

व्यापता न येणारं अस्तित्व  असते,
परत फेड करू न शकणार मातृत्व ती असते..
म्हणूनच तर ती फक्त आणि फक्त आई असते.

नऊ मास उदरी वेदना तीच सोसते,
तिची जगावेगळी माया कुशीत घेऊनी हसवते..
म्हणूनच तर ती फक्त आणि फक्त आई असते.

मिठीत अलगद घेउनी गोंजारूनी जग दाखवते,
आपल्याच लेकरात स्वताची प्रतिमा ती पाहत असते..
म्हणूनच तर ती फक्त आणि फक्त आई असते.
म्हणूनच तर ती फक्त आणि फक्त आई असते.

कवी  सौ. योजना वाघमारे 


Post a Comment

0 Comments