मित्रानों ,
दोन ओळी जुळवण्यासाठी
तासंतास तडफडनं,
सोपं नसतं.
हजारो दिवसाचं उभं आयुष्य फक्त
काही ओळीतच माडणं,
सोपं नसतं.
मनातील दुख: सोबत सुखाचा क्षण
प्रतेक्षात उतरवणं,
न आलेले अनुभव सुद्धा
दोन ओळीत संपवणं,
सोपं नसतं.
आनंदी नसताना सगळ्यांसमोर हसणं,
सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी
स्वतःच्या दुख:ला पडद्याआड लपवणं,
सोपं नसतं.
विनोदी कविता करताना विनोदवीर व्हावं लागतं,
समोरच्याला हसवायचं असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं,
प्रेम कविता लिहण्यासाठी प्रेमात सुद्धा पडावं लागतं,
शिवाय प्रेमभंग झाल्यास तश्या भावनांना जागं करावं लागतं,,
समोरच्याला जास्त त्रास न देता कमीत - कमी शब्दात व्यक्त
व्हावं लागतं,
आपल्या लिहिण्याने समोरच्याच्या मनाला ठेच तर नाही ना
पोहचणार
एवढ्या समजुतीने ते लिहावं लागतं.
मात्र हे सगळं करत असताना स्वतःच्या खऱ्या आयुष्याला
कुठे तरी झाकावं लागतं.
त्यामुळे
कवी होणं कोणासाठी एवढं पण सोपं नसतं,
एवढं पण सोपं नसतं.
- सुमित वाघमारे
0 Comments