ticker

6/recent/ticker-posts

आधार सोशल मिडीयाचा मिळाला

 


अनेक माणसं येतात आयुष्यात तशीच ती देखील आली होती

आमच्या मैत्रीची ओळख ही फेसबुकवरती झाली होती. 

 

फेसबुकवरची प्रत्येक पोस्ट मी तिची लाईक सुद्धा करायचो

तीला इम्प्रेस करण्यासाठी कमेंट देखील करायचो. 

 

सवय लागली होती मला तीच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करायची,

एवढा घमेंडीपणा होता तीला की ती कधी थँक यू नाही बोलायची.

 

तरीही

पहिला मेसेज मीच केला, त्यातुन एकमेकांचा स्वभाव कळाला

हळू - हळू संवाद वाढताच तिचा व्हाट्सएप नंबर मिळाला.

 

बोलता बोलता आम्ही एकमेकांना खुप समजु लागलो

कधी एकमेकांच्या आवडी जपत तर कधी मनाविरुद्ध वागलो.

 

या अशाच वागण्यामुळे आमचे प्रेम देखील फुलत होते,

दुर असलेले नाते आमचे मनापासून जुळत होते. 

 

घट्ट मैत्री झाली की मी तिला भेटण्याची मागणी केली,

नाही नाही म्हणता ती भेटण्यास तयार झाली. 

 

पहिली भेट आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली

त्याच दिवशी आमच्यात नव्या नात्यास सुरूवात झाली.

 

आम्ही एकमेकांना आपलं होतं मानलं,

नको वाटणाऱ्या सोशल मिडियाने होतं जवळ आणलं. 

 

आज आम्ही एकत्र आहोत यात सोशल मीडियाचा वाटा आहे

तिने पाठवलेल्या फोटोंचा माझ्याकडे साठा आहे. 

 

आज सोशल मीडियाचा आधार नसता तर आमचे नाते फुलले नसते,

दुर असणारी माणसं आपली होऊन जातात हे आम्हा कळले नसते.

 

सोशल मीडियामुळे आयुष्यातील आनंदाचा अर्थ आम्हास कळाला

आमच्या फुललेल्या नात्याला आधार सोशल मीडियाचा मिळाला.

 

- सुमित वाघमारे

Post a Comment

0 Comments