जेवढं जपावं याला आपण,
कुठं ना कुठं कमी पडतो,
हा विश्वास आहे याला प्रत्येक ठिकाणी निर्माण
करावाच लागतो.
कधी तो दाखवावा लागतो,
तर कधी तो ठेवावा लागतो,
उदार अंत : कारणाने तो कधी द्यावाही लागतो,
हा विश्वास आहे याला प्रत्येक ठिकाणी निर्माण
करावाच लागतो.
नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी,
एकमेकांना समजून घेण्यासाठी,
कधी इतरांसाठी तर कधी स्वत:साठी,
जपून ठेवलेलं नातं टिकवण्यासाठी,
तो संपादनही करावा लागतो,
हा विश्वास आहे याला प्रत्येक ठिकाणी निर्माण
करावाच लागतो.
कधी याचा उपयोग होत भल्या मोठ्या व्यवहारासाठी,
तर होतो याचा उपयोग एकमेकांना जपण्यासाठी,
होतोच कधी उपयोग याचा,
प्रेमाचं नातं फुलवण्यासाठी - दोन मनं
जुळवण्यासाठी.
कधी होतो याचा उपयोग,
कोणाच्या सुखासाठी तर कोणाच्या दुख:साठी,
कोणाच्या आत्मविश्वासाठी, कोणाच्या प्रयत्नांसाठी,
हरलेल्या यशासाठी, कोमेजलेल्या पाखरासाठी,
उडण्याचे सामर्थ्य सोडलेल्या पक्षासाठी,
उडण्याचे सामर्थ्य निर्माण केलेल्या गरुड
झेपेसाठी,
मनात दडलेल्या भितीसाठी, न केलेल्या कृतीसाठी,
नवी उम्मेद निर्माण करण्यासाठी,
तर पुन्हा अस्तित्व निर्माण करण्यासाठी,
तो लागतोच सोबत आपल्या, आपलं आयुष्य जगण्यासाठी,
प्रत्येकालाच याचा उपयोग होतो आपआपल्या
आयुष्यासाठी.
प्रत्येक गोष्टीला जोडून ठेवण्यासाठी हा मदत
करतो,
पण हा विश्वास आहे,
याला प्रत्येक ठिकाणी निर्माण करावाच लागतो.
- सुमित वाघमारे
0 Comments