प्रत्येक नवऱ्याने बायकोचे मन समजून घ्यावे,
आठवडयातून एक दिवस जास्त झोपू द्यावे.
काय होत एक दिवस तिला चहा करून द्यायला,
तुमच्या बद्दलचा आणखीन वाढेल मनात जिव्हाळा.
बिना कामाची खुसपूस काढून उगाच भांडू नका,
कधीचही काही काढून बाजारात मांडू नका.
सकाळ संध्याकाळ राबत असते स्वयंपाक घरात ती…
म्हणून तिला एक दिवस सुट्टी दिली पाहिजे,
हॉटेल मध्ये जेवणाची ऑफर केली पाहिजे.
माणूस म्हणून तिच्याकडे बघा,
तिच्या सवे आनंदात जागा.
असू द्या तुमच्या मनाच्या डायरीत तिच्या कष्टाच्या नोंद,
कारण तिच्या हृदयात आहे तुमच्या नावाची गोंद.
ती कुठे म्हणते अमेरिका फॉरेनला जाऊ,
तिला हि वाटत असेल निदान महाबळेश्वर तरी पाहू.
छोट्या छोट्या इच्छा असतात तिच्या,
त्याच कवितेत मांडल्यात माझ्या.
- योजना वाघमारे
2 Comments
Nice
ReplyDeleteVery nice yojana
ReplyDelete