शाळा भरायची घंटा होयची,
तयारी मैदानात आमची चालायची.
एका हाताचे अंतर घेऊन ओळीत उभे राहायचो,
राष्ट्रगीत,प्रतिज्ञा,संविधान वाचनासोबत रोज एक श्लोक म्हणायचो.
उशिरा येणाऱ्यास सुट्टी नव्हती
त्याला अंगठे धरवेच लागायचे,
आम्ही कुठे सुधारण्यातले होतो
आम्ही तसेच पुन्हा वागायचे.
दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत गलका असायचा आमचा,
घरचं जेवण कमी पण तो
शाळेतला करपा भात खायचा.
भात करणाऱ्या भाभींच्या हाताला चव होती न्यारी,
त्यांच्या हाताचा वरण-भात लागायचा खूप भारी.
जेवणाची जरी सुट्टी असली तरी बोंबलत आम्ही
हिंडायचो,
दिसलोच शाळेबाहेर शिक्षकांना
तर पुन्हा अंगठे धरायचो.
मुख्याध्यापकांच्या आमच्या अख्या शाळेत दरारा
असायचा,
अचानक वर्गात आले तर अख्खा वर्ग शांत बसायचा.
माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षकाचा माझ्या
आयुष्यात मोलाचा वाटा आहे,
तुम्ही दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा
माझ्याकडे साठा आहे.
मातीच्या या गोळ्याला तुम्हीच घडवलं,
देऊन योग्य ते संस्कार माणूस होण्यालायक
शिकवलं.
पडद्यामागचे खरे कलाकार मामा आमचे असायचे,
सर्व शिक्षकांची कामे ते बिनचूक करायचे.
मी तुमच्या मुळे घडलो याची जाणीव शेवटच्या
श्वासापर्यंत राहील,
माझ्या हृदयात तुमची जागा अविस्मरणीयच राहील.
आठवतेय आम्हाला अजून
आमचे शिक्षक,मित्र,मैत्रिणी,तो खडू आणि फळा,
आणि सर्वांच्या मनात राहिली आहे ती
आठवणीतली शाळा.
- सुमित वाघमारे
0 Comments