माझ्या आनंदाचे कारण तू ,
दुख: मागील सुख तू ,
प्रेमाचे धरण तू ,
या घराचे घरपण तू .
या अंत:रातील आत्मा तू ,
आयुष्याची व्याख्या तू ,
माझ्यावरचे संस्कार तू ,
मला घडवणारा शिल्पकार तू .
मी तर फक्त अक्षर आहे ,
माझ्या प्रत्येक वाक्यातील शब्द तू .
असलो जरी वंशाचा दिवा ,
पण त्याला जगवणारी वात आहेस तू .
घरी येण्याची ओढ तू ,
प्रेम,माया,ममता या सर्वांची एक सावली तू ,
आम्ही सगळे या सर्वाचा भाग आहोत ,
पण आपल्या कुटुंबाचा खरा कणा आहेस तू .
रागावणारे प्रेम तू ,
हसवणारी माया तू ,
सर्वांसाठी आहोरात्र झिजणारी काया आहेस तू .
लहानपणापासूनच शिक्षक तू ,
मला घडवणारा विषय तू ,
माझ्या आयुष्याचे पुस्तक तू ,
पण माझे फक्त नाव आहे,
त्यामागील यश तू .
मदर, मॉम, मम्मी, अशी आहेत नावे भरपूर तुला,
पण माझ्यासाठी माझी आई आहेस तू,
आई आहेस तू.
- सुमित वाघमारे
0 Comments