ती वर्गात येताच,मन आनंदाने फुलायचे,
अंतःकरणातील सारी गुपितं आपोआप खुलायचे.
ती वर्गात येताच,तिच्याकडे एक टक पाहणे,
ब्रेकमध्ये मात्र तिच्याच मागे फिरणे.
ती वर्गात येताच,वाट पहायची तिच्या बगण्याची,
नक्कल मात्र माझी असायची त्या निरागस तिच्या
वागण्याची.
ती वर्गात येताच,मन तिच्यासाठी वेडं असायचं,
पुढे लेक्चर कोणते चालू आहे त्याच भान मला
नसायचं.
ती वर्गात येताच,आनंद गगनात मावत नसायचा,
एका नजरेला नजर मिळावी म्हणून सतत माझा प्रयत्न
असायचा.
ती वर्गात येताच,तिला पाहण्यासाठी जीव तरसायचा,
ति ज्या बेंच बसेल,त्याच लाईनमध्ये माझा बेंच
असायचा.
ती वर्गात येताच,फिलिंग वेगळी माझी असायची,
समथिंग समथिंग काहीतरी घडतंय याची जाणीव मात्र
द्यायची.
ती वर्गात येताच,जेव्हा ती नजर चुकीने पहायची,
तेव्हा माझी तिच्याकडे बगण्याची स्टाईल सुद्धा
बदलायची.
ती वर्गात येताच,मी विविध स्वप्न रंगवायचो,
प्रत्येक स्वप्नात माझ्या मी,तिच्या जीवनाचा साथीदार
असायचो.
तिच्यामुळे मी पूर्ण बदललो,
पण ती कधी माझी झालीच नाही.
शाळा सुटली,स्वप्न तुटली,
सारं काही क्षणात बदलत गेलं.
ती वर्गात यायची बंद झाली,
आणि मी वेडा......मी वेडा .....
तिच्यासाठी दिवसरात्र झुरत राहिलो.
0 Comments