ticker

6/recent/ticker-posts

न बोलताच तू

 

आज सारं काही बोलायचं ठरवलं

पण 

न पाहताच तू निघून गेली,

आज सारं काही सांगायचं ठरवलं

पण

न बोलताच तू , सारं काही बोलून गेली.

 

माझ्या मनातले मनातच राहिले,

तू मला बोलायचे नाही

असे तुझे तूच ठरवले.

आयुष्यभर साथ देणार होतीस,

मग का आर्ध्यावर्ती सोडून गेली.

 

न बोलताच तू , सारं काही बोलून गेली.

 

अजून देखील वाट पाहतोय तुझी,

एकदा मला भेटून जा,

दुसरे तिसरे काही नको 

दोन शब्द बोलून जा.

वाट पाहतोय तुझी त्याच रस्त्यावर

जिथं तू आठवणी सगळ्या सोडून गेली.

 

न बोलताच तू सारं काही बोलून गेली.

 

- सुमित वाघमारे 

Post a Comment

0 Comments