ticker

6/recent/ticker-posts

तुझ्याच प्रेमात पडे

 पाहताना तुझ्या त्या निरागस डोळ्यांकडे,

नको असताना पण मन माझे तुझ्याच प्रेमात पडे.

बसता - उठता, चालता - फिरता होतो तुझाच भास,

तुला कसबसं मिळवणं हाच माझा ध्यास,

तुझ्यामुळे वेडे माझी झोपच उडे

नको असताना पण मन माझे तुझ्याच प्रेमात पडे.

बोलताना मात्र तुझ्याशी मन माझे मनातच दडे,

तु दिसताच समोर मन माझे पाखरू होऊन उडे.

पाहताना तुझ्या त्या निरागस डोळ्यांकडे,

नको असताना पण मन माझे तुझ्याच प्रेमात पडे.

- सुमित वाघमारे

Post a Comment

0 Comments