आयुष्य फुलपाखरासारखं झालय १४ दिवसाचं,
निट जगता सुद्धा येत नाहीये,
पण स्वप्न खुप मोठी आहेत,
अगदी आसमंतात झेप घ्यायची.
जीवन खुप छान आहे,
पण जगणे मात्र अवघड आहे.
उधान वाऱ्यासारखं मन आता उडू लागलं,
आयुष्याला पाहून स्वत:वरतीच हसू लागलं.
मनाने पण विचार केला,
जगलो तर स्वत:साठी,
आणि मेलो तरी स्वत:साठीच.
वेड्यासारखं सैरावैरा मन आता पळू लागलं,
नको त्या आशेचे पंख घेऊन
उंच - उंच उडू लागलं.
आयुष्य हे एकदाच मिळणारी गोष्ट आहे,
सर्वांशी प्रेमाणे वागायचं,
मिळालंय तेवढ्यात समाधान मानून,
आनंदात जीवन जगायचं.
- सुमित वाघमारे
0 Comments