ticker

6/recent/ticker-posts

शेवटचे पान...



आयुष्य नावाची वही पूर्ण भरली,

आणि शेवटचे पान लिहायची वेळ ती आली.

 

जाताच शेवटच्या पानावर

उजाळा पडला आठवणींवर,

कारण बरचं काही आधी लिहले होते त्याच्यावर.

 

शेवटच्या पानाची एक खासियत असायची,

आयुष्याचे गणित कच्चे असले

तरी त्याची नोंद पक्की असायची.

 

आज

शेवटच्या पानावर मनात ठरलेलंच लिहायचं ठरवलेलं,

पण मला काही सुचेना

कारण एका कोपऱ्यात मित्रमंडळाचं नाव

होत गडद अक्षरात गिरवलेलं.

                                                                                               

चित्रकलेचा कधी रस नव्हता

पण माझी वेडी वाकडी कला ते पानही सहन करायचे,

पण मिळायची उत्तरे ही तिथेच

कधी भागाकाराचे तर कधी गुणाकाराचे.

 

शेवटच्या पानाची एक वेगळीच गंमत होती,

कोडी सोडवण्याची ती खरी कसोटी होती.

 

बऱ्याच गोष्टींना आज त्या एका पानामुळे उजाळा मिळाला,

हे सर्व पाहिल्यावर आपल्यातील बालीशपणा काळाला.

 

आयुष्य देखील असचं आहे,

वहीच्या सर्व पानांसोबत शेवटच्या पानाचा संदर्भ असणे गरजेचा असतो,

कारण

सगळ्या वहीचा शेवटहा त्याच्यावरतीच लिहायचा असतो. 

 

सुमित वाघमारे 


Post a Comment

0 Comments