ticker

6/recent/ticker-posts

अबोल पत्र (एक मनातील संवाद)

 


डियर नवरोबा,

          आज घरातील सर्व काम आटपले आणि आपल्या बेडरूम मध्ये एकटीच बसलेतेव्हा तुमची खूप आठवण आली अगदी डोळ्यांतून टपटप अश्रू देखील कोसळलेतुमच्या कामाच्या व्यापात असे वाटते कि तुम्ही मला विसरत चालला आहात कि काय ?

          आज जेव्हा आपल्या बेडरूम मध्ये आले तेव्हा ते जुने पण अगदी मनाला स्पर्श करून जाणारे काही क्षण मला आठवले. तुम्ही घरात येण्याची चाहूल हि त्या मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधानेच होत होती. पण आज तो गजरा कुठेतरी हरवला गेलाय हो....

          पूर्वी तुम्ही माझ्याकडे हसून पहिले कि खूप भारी वाटायचंपण आता तुम्ही हसूनच काय अगदी रागाने सुद्धा पाहत नाहीतेव्हा खूप वेदना होतात मनातएवढे काय काम करता तुम्ही कसे काय एवढे व्यस्त असताआणि कोणासाठी करताय...एका वंशाच्या दिव्यासाठीपुढे तो आपल्याला सांभाळेल का नाही याचा अंदाज न घेताच त्याच्यासाठी एवढं  सारं.. नाही करा तुम्ही त्याच्यासाठी, आपण जगतोय त्याच्यासाठीच आपण आपलं पूर्ण जीवन आपल्या मुलांच्या भवितव्यासाठीच खर्च करणारे पण  मी या देहाचा खांब करून पूर्ण घर तोलते आहे तर तिच्यासाठी एक गजरा नाही आणता येत. तिच्यासाठी एक गोड हास्य पण देता येत नाही तुम्हाला.

खूप वाईट वाटते......

          आपलंच माणूस आपल्यापासून खूप दुरावत चाललाय हे पाहताना खूप रडू येतंपण तेव्हा समजूत घालणारे कुणी आपलं माणूस मिळत नाहीमी कोणाकडे तरी मन मोकळे पणाने बोलेल असे तुम्हीच आहात पण तुमच्याकडे माझ्यासाठी आता एक मिनिटपण वेळ नाही

कधीतरी माझ्यासाठी काढताल का हो एक तास वेळ.

प्लीझ......

खूप काही बोलायचे आहे....अगदी मनातलंमनात साठवलेलंखूप दिवसाचंअगदी मोठ्या आवाजात तुम्हाला आय लव्ह यु म्हणायचं आहेतुमच्या बरोबर लांब फिरायला जायचे आहे.

माझ्यासाठी नाहीच पण तुमच्यासाठी तो लाल कलरचा शर्ट घ्यायचा आहे.

"तो नाही का.....आपण त्या दुकानात पाहिलेला" 

माझ्यासाठी फक्त एक तास द्या. या एका तासात मी माझ्यासाठी काहीच नाही मागणार मला फक्त तुम्ही एक तासपाहिल्यासारखे हवे आहात...

तुम्हाला मला पूर्वी सारखं पहायचं आहे.

द्याल ना मला तुमचा एक तास वेळ.......


तुमचीच,

श्रीमती 

 

शब्दांकन : सुमित वाघमारे 


Post a Comment

0 Comments