प्रिय, बायको
तसं बोलायला काही नविन नाही,
पण आज लिहिलय तुझ्यावर थोडं काही.
शुन्यातून विश्व निर्माण करताना तुझी लाभली साथ,
खंबीरपणे उभी राहिलीस देऊन हातामध्ये हात.
छोट्या छोट्या गोष्टींचा तुला आनंद भरपूर वाटतो,
तुझ्या चेहर्यावरचा आनंद माझ्या नजरेत पटकन साठतो.
नव - नवीन टेक्नॉलॉजीसोबत तु पटकन स्वतःला बदललेस,
मैत्रीपुर्ण वातावरणात तु लेकरांना आपल्या घडवलेस.
तसं पाहायचं तर, आहे भरपूर लिहिण्यासारखं काही,
कारण, तुझ्याशिवाय या घराला घरपणच नाही.
कधी करते तु रागराग, कधी तू चिडते,
तुझ्या त्या आबोल्यामागे सुध्दा, तु आमच्यावर जिवापाड प्रेम करते.
हसत्या - खेळत्या संसाराला आज कित्येक वर्ष लोटून गेली,
कधी केला ना हट्ट कोणत्या गोष्टीचा तू, ना कधी हाव केली.
तसं पाहायचं तर, आहे भरपूर लिहण्यासारखं काही,
कारण, तुझ्याशिवाय मला मोठा असा आधारच नाही.
जबाबदाऱ्यांचे ओझं तुझ्यासाठी झाले आता गंभीर,
दुःखात मात्र सोबत असते पदर खोचून तू खंबीर.
गुणाची बायको तू कोणत्याच गोष्टीत कमी नाही,
प्रेमळ,उदार मनाची तु तुला व्देष कोणाचा नाही.
तुला सांगण्यासारखे आहे बरच काही,
पण थोडक्यात बोलायचे झाले,
तर बायको तु माझ्यासाठी आता बनली आहेस सर्व काही.
तुझाच, श्रीमान
- सुमित वाघमारे
0 Comments