एका
वेगळ्याच विषयावर लिहिलेली कविता.
वाहन अपघात... (सुरक्षा साप्ताह)
थांबा जरा लक्ष देऊन वाचा,
यात फक्त शब्द नाहीत...
हा आहे सुरक्षिततेचा साचा.
स्वत:चा जीव धोक्यात घालणं तुला पडेल महागात,
तुझ्या जाण्याने आधार जाऊ शकतो कुटुंबाचा...
जेव्हा तु नसेल या जगात.
उठ माणसा तू जागा हो, वाहन
नियमांचे पालन कर,
चार चाकीत सीट बेल्ट लाव...
दुचाकीवर हेल्मेट घालून तू प्रवास कर.
थोडसं तू लक्ष दे हलगर्जीपणा करू नको,
जीव वाचेल तुझा देखील...
वाहन नियमांचे उल्लंघन करू नको.
विचार कर, शर्टासकट
तू गुंडाळला जाशील,
तुझ्याच एका चुकीमुळे...
मरणाला कवटाळून घेशील.
डोळ्यासमोर चित्र आन एका मशीनने जीव घेतला,
हो... हो...
तुझ्या निष्काळजीपणामुळे तू विनाकारण चेतला.
भल्या मोठ्या वेगात ओवरटेक कशाला करतो,
ब्रेक, क्लच
सावरता...सावरता...
गाडीखाली जाऊन मरतो.
तुझं मरण तुझ्यासाठी झाले असेल स्वस्त,
तुझ्या जाण्याने कसे वाटेल घरात मस्त.
ध्यानात ठेव हे शब्द...
वेगावर तुझ्या नियंत्रण ठेव,
पुढे जाण्यासाठी...
ओवरटेक करण्याचा आवर चेव.
गमावशील जीव तू क्षणात,
त्यासाठी...
वाहन नियम कायम ठेव ध्यानात.
कायम ठेव ध्यानात.
0 Comments