ticker

6/recent/ticker-posts

हात खांद्यावर पाहिजे...

 



आयुष्याची वाट लावणारा वाटाड्या सोबत पाहिजे,

चूक बरोबरची दिशा दाखवणारी मशीन सोबत पाहिजे.

 

हसता हसता आपल्यासाठीच रडणारा सोबत पाहिजे,

चेहरा बघता प्रोब्लेम ओळखणारा अंतर्यामी सोबत पाहिजे.

 

हृदयाच्या एका कोपऱ्यात जागा त्याची स्पेशल पाहिजे,

जीवाला जीव देणारी काळजी सोबत पाहिजे.

 

इजा होताच मला डोळ्यात पाणी त्याच्या पाहिजे,

जुन्या पुराण्या जखमांना बरं करणारा मलम सोबत पाहिजे.

 

लहान लहान गोष्टीवरती चिडणारा सोबत पाहिजे,

मोठ्या संकटात खंबीरपणे मागे आधार सोबत पाहिजे.

 

उन्हामधल्या दुखात सुखाचा पावसाळा जीवनात पाहिजे,

मृत भावनांना पुसणाऱ्या मखमलीचा स्पर्श सोबत पाहिजे.

  

संकटकाळात सोडणारे हजार हात नको मला...

एकच असा हिरा सोबत माझ्या पाहिजे,

धीर देऊन आधार देणारा मित्राचा हात

खांद्यावरती पाहिजे,

असा एक मित्र जीवनात माझ्या पाहिजे.

 

- सुमित वाघमारे

Post a Comment

0 Comments