तर सुरवात अशी की....
२० मार्च १९२० साली महाड सत्याग्रहाच्या
रूपाने सामाजिक कार्य सुरु केले, हा संगर माणुसकीसाठी होता.
नैसर्गिक पाण्यावर सर्वांचा हक्क असतो तो अस्पृशांना मिळत नव्हता म्हणून महाडच्या
तळ्याचा सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला, त्यांनी
प्रथम तळ्यात उतरून ओंजळभर पाणी प्राषण केले. नंतर सर्व लोक त्या तळ्याचे पाणी
प्याले आणि चौदार तळ्याचे पाणी सर्वांना खुले झाले. त्या नंतर मनुवाद्यांनी
अस्पृश्यांच्या जेवणात माती कालवली आणि त्यांना मार हाण पण केली, माणसाविरुद्ध केलेली हि अद्भुत क्रांती होती. जगाच्या पाठीवर पाण्यासाठी
अशी क्रांती म्हणजे दबलेला आवाज आणि त्याविरुद्ध केलेला बदल हाच महाडच्या चौदार
तळ्याचा संगर होता. जोपर्यंत वर्ण व्यवस्था आहे जाती व्यवस्था आहे तोपर्यंत
अस्पृश्यता आपली हीनता आहे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आणि त्यांनी मानवी
स्वातंत्र्याचे रणसिंग फुंकिले.
चवदार तळ्याचे पाणी नव शक्ती
मानवा आली, या शक्ती मागे मूर्ती भीम काय देई स्पुर्ती.
जणू मुक्यास दिधली वाणी
चवदार तळ्याचे पाणी, नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची आर्त विराणी,
हे चवदार तळ्याचे पाणी...
त्यानंतर २५ डिसेंबर १९२७ साली मनुस्मृती जाळली. तो दिवस मानव मुक्तीचा होता, स्त्रियांच्या अनेक पिढ्या जाळल्या म्हणून क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. महिलांचा, अस्पृश्यांचा, अनुसूचित भटक्या विमुक्त जाती इ. यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी धुरा हाती घेतली आणि सरतेशेवटी होणारा अन्याय त्यांनी दूर केला. अनिष्ट प्रथा असणारी मनुस्मृती ग्रंथ जाळला.
पुढे १९३० ला नाशिकच्या काळाराम मंदिराच्या लढ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे पुढारी म्हणून प्रसिद्ध झाले. या लढ्याने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगाचे आदर्श होते, काळाराम मंदिर लढ्याला १९३० ते १९३५ अशी पाच वर्षे लागली आणि शेवटी कोर्टाने निर्णय दिला आणि काळाराम मंदिर सर्वांसाठी खुले झाले. पुढे याचप्रमाणे चौदार तळ्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आणि चौदार तळे न्यायव्यवस्थेने सर्वांसाठी खुले केले. या साऱ्या क्रांत्यासोबत अनेक मंदिरे बाबासाहेबांनी खुली करून दिली त्यात अमरावतीचे देवीचे मंदिर असेल किंवा पर्वती मंदिर. अशी सामाजिक क्रांती डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाने भारताच्या विकासाला योगदान दिले.
पुन्हा सुरुवात झाली ती महिला सुरक्षिततेची बाबासाहेबांनी त्यासाठी अथक परिश्रम घेऊन हिंदू कोडबील तयार केले आणि ते संसदेत मांडले पण नेहरू सरकारने ते नामंजूर केले. हे बिल १९४० पासून ४ वर्षे १ महिना २६ दिवस अथक श्रम घेऊन तयार केले. स्त्रियांसाठी हक्क प्रविष्ट व्हावे मग ते घटस्पोट, स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा, समान हक्क, आई वडिलांच्या मालमत्तेत मुलांबरोबर हिस्सा असेल, पोडगी किंवा दत्तक विधान असे अनेक हिताचे कायदे त्यात होते पण ते सरकारने नामंजूर केले. म्हणून क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदामंत्री पदाचा ताडकन राजिनामा देऊन सरकारला एक आदर्श दाखविला.
१९३० ते १९३२ ला इंग्लंडला गोलमेज परिषद भरली होती, त्यावेळी परिषदेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण होते. त्या परिषदेत अस्पृश्यांच्या न्याय मागण्या मांडल्या, मानवी हक्कासाठी मागण्या होत्या त्या इंग्लंड परिषदेत मांडल्या व त्या मंजूर केल्या. पण स्वतंत्र मतदार संघ मिळाला आणि इतर मागण्या मंजूर झाल्या की म.गांधीजींनी तीव्र विरोध केला त्यांचा विरोध म्हणजे हा सर्व कॉंग्रेसचा विरोध होता. गांधी प्राणांतिक उपोषणास बसले व म्हणाले माझा जीव गेला तरी मी अस्पृश्यांच्या मागण्या मान्य करणार नाही. आंबेडकरांपुढे गांधीजींचे काही चालेना म्हणून भगवत गीता घेऊन एका रात्री बॅरीस्टर जिन्हाकडे गेले व म्हणाले, मी गीतेवर हात ठेऊन सांगतो की बाबासाहेबांच्या मागण्यांना विरोध करा... महात्मा समजणाऱ्या गांधीजींची अमानवी चाल ओळखून जिन्हा म्हणाले आम्ही जसे अल्पसंख्याक मागण्या मागतो तसे बाबासाहेब मागत आहेत तसे अधिकार त्यांना पण आहे आणि एका अल्पसंखेवर दुसऱ्या अल्प गटाने विरोध करणे हे न्याय नसून ती अमानवीय भूमिका आहे. शेवटी पुणे करारावर आंबेडकरांनी सही केली व गांधीजींचे प्राण वाचविलेच.
घटनासमितीत डॉ. आंबेडकर नको म्हणून त्यांना कॉंग्रेसने कसून विरोध केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर संसदेचे दारं, खिडक्या काय तावदाने पण बंद केल्या आणि म्हणाले बघूया आता आंबेडकर कसे संसदेत येतात ते. पण डॉ.बाबासाहेबांचा इरादा पक्का आणि कायम होता, आणि आंबेडकर हे घटना समितीत आवश्यक आहेत हे प्रथम मुस्लीम लीगने ओळखले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शे.का. पक्षाच्या तिकिटावर बंगाल प्रांतातून जोगेंद्रनाथ मंडल व मुस्लीम लीगने निवडून आणले. तदनंतर बाबासाहेब हे मुंबईतून निवडून आले आणि घटनासमितीचे अध्यक्ष झाले त्यांनी घटनेची धुरा हाती घेऊन उच्च नीच, जात व्यवस्था, धर्म पंत, विषमता झुगारणारी सर्वसमावेशक मौल्यवान राज्यघटना ज्याला आपण संविधान म्हणतो ते दिले, जे लिहण्यासाठी २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागोपाठ परिश्रम घेऊन भारतवासीयांच्या हाती २६ नोव्हेंबर १९४९ रोजी बहाल केली.
सामाजिक क्रांतीसाठी व कार्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक, बहिकृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत अशी पाच वर्तमान पत्रे काढली. तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी, सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. पुढे भारतीय बौध्द महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इत्यादी सामाजिक संस्था उभ्या केल्या आणि सामाजिक, आर्थिक व न्यायिक दृष्टीने समाजाला सुदृढ बनवले.
क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर हे एक शोध आणि बोध आहे... १३ ऑक्टोबर १९३५ साली जेव्हा एवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली तेव्हा भारत नव्हे तर जागतिक पातळीवरून प्रतिक्रिया आल्या त्यावेळी बाबासाहेबांनी कोणत्याही धर्मात प्रवेश केला असता तर जागतिक पातळीवर संघर्ष झाला असता पण आंबेडकरांनी तसे केले नाही, धर्मांतर करतानासुद्धा देशाचा विचार केला. अनेकांनी बाबासाहेबांना आमिषे दाखवली डॉ. जयकर, बिर्ला, मदन मोहन मालवीय, राजा गोपालचारी यांनी धर्मांतराबद्दल सामोचारिक भाषा केली. आम्ही हिंदू धर्मात सुधारणा करू पण दुसरा धर्म स्वीकारू नका अशी विनंती केली, शेवटी बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दीक्षा देऊन आठ लाख अनुयायांसोबत याच देशातला बौद्ध धम्म स्विकारला. जगात अनेक क्रांत्या झाल्या, त्यातील काही रक्ताच्या तर काही मृत्यूला छेडणाऱ्या होत्या पण एका पेनाच्या शाईने आपल्या विचारकौशल्याने घडवलेली नव क्रांतीचे जनक जो ओळखला गेला भीमसूर्य क्रांतीचा डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.
हे जीवन घडले
क्रांतीमुळे...!!
जशी नभास भिडली ती नवकोटी
कुळे, आज आम्हाला आमची किंमत कळे.
झाली जगात क्रांती ना रक्ताचा
थेंब गळे, गेली गुलामगिरी तो सन्मान आता मिळे.
केवढी हि उत्क्रांती त्या
एका क्रांतीसूर्यामुळे, त्या एका प्रज्ञासूर्यामुळे.
सिध्द हे करण्या नेतृत्व जगाचे विचार विश्वाचा हो समृद्ध राजा.. न्यून गंड नको बाळगू समाजा.
लेखक - शिवलाल चितारे गुरुजी
0 Comments