ना कशाची भूक ना तहान...
विसरून जावं वाटतं तुझ्यात
स्वतःला
करून टाकावा तुझा मनापासून
मनाचा स्विकार
आणि दिड शब्दात व्यक्त
व्हावं तुझ्याजवळ
तु हळूच जवळ येऊन म्हणावं...
हो, मला हि तू आवडतोस.
माझ्या सर्व स्वप्नांचे घरटे
अजूनही
पारंबीला टांगले आहेस तु
वाटतं त्यात एका जोडप्यानं
राहावं
करावीत स्वप्न साकार तुझी
आणि माझी ही
आणि जगावं फक्त
एकमेकांसाठीच...
झुलावं त्या खोप्यामंधी...
काढाव्यात अशा कितीतरी
रात्री
ज्या फक्त आठवणी सोडतील
पाठीमागे
मला स्वप्नातून जागं करायला
तु जवळ यावं आणि म्हणावं...
हो, मला हि तू आवडतोस.
तुझ्या नकाराची सवय मज आता
पुरेपुर झाली आहे
पण नेहमीच जाणवतो तुझ्यात तो
प्रेमाचा ओलावा
तुझी काळजी, या माझ्या स्वप्नांची दारं खुली करतं
वाटतं तु ही माझ्यावर माझ्या
एवढंच प्रेम करतेस
बंद खिडक्या उघडताच मला तुच
दिसते
आणि वाटतं असं किती अंतर आहे
आपल्यात
एकमेकांत विलीन होण्यास...
एक खिडकी तर उघडायची आहे
मनाची
ज्याने स्विकार करावा एका
निःस्वार्थी प्रेमाचा
तीच खिडकी उघडून तु जवळ यावं
आणि म्हणावं...
हो, मला हि तू आवडतोस...
बग कदाचित संधी अजूनही गेली
नसावी
करून टाक एखाद्याच्या खऱ्या
प्रेमाचा स्विकार
पुन्हा अशी व्यक्ती तुला
मिळेल न मिळेल कुठे
मग ठाव घेशील माझा मी तुला
सापडणार नाही
शोध घेशील माझा इकडे तिकडे
मी दिसणार नाही
मी जवळ असेल तुझ्याच तुला
जाणवणार नाही
कावरी बावरी होशील माझा शोध
घेताना
मी तुझ्याच हृदयाच्या
कप्प्यात स्वतःला डांबून ठेवलं असेल
आणि तु मला बाहेरच्या वाटेवर
शोधशील.
तेव्हा गमल्याची खंत वाटेल
तुला आणि रडशील धाय मोकून
मला गमण्याआधीच, तु जवळ यावं आणि म्हणावं...
हो, मला हि तू आवडतोस...
हो, मला हि तू आवडतोस...
- सुमित वाघमारे
_____________________________
सदर संपूर्ण कविता युट्यूबवर
पहा.
0 Comments